एक प्रेम असही ...
आज शब्द कमी पडतात माझे, कारण तुझं अस्तित्वच खूप बोलतं... एकेक क्षण तुझ्यासोबत राहून, माझं मन आता स्वतःला ओळखत..🤞 ना आधीचं दुःख आठवतं आता, ना उद्याची घाई उरलीये... आजच्या या शांत क्षणातच, माझी सगळी दुनिया भरलीये..💛 ना प्रश्न विचारायची गरज उरते, ना उत्तरांची वाट बघतो.... तू समोर असलीस की एवढंच कळतं, हे "आत्ताचं” प्रेम मनापासून जगतो..🌸 तुला काहीतरी सांगायचं आहे, पण ओठांवर शब्दच थांबलेत तुझ्या शांत नजरेच्या गहिर्यात, माझे सगळे अर्थच हरवलेत ✨ कधी एकट्यानं जपलेलं ते प्रेम, आज तुझ्या नजरेत थोडंसं दिसतंय… अजून “आपलं” म्हणायची वेळ नाही, पण “होईल” ही आशा मनात उमलतंय ✨ आशा आहे की या भावनांना एक दिवस नाव मिळेल खास… “एक प्रेम असही…” नाही आता, “आमचं प्रेम असं आहे…” हाच श्वास 🥺✨🌸
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
