तयारी एका नवीन युद्धाची
तयारी एका नविन युद्धाची =============================== अस्त्र, शत्र विणा कंबर खोचुन, तयारी एका नविनच, युद्धाची, लवकरच करावी लागणार, लढाई आता घर वाचवण्याची. गजब दुनिया आजब प्रश्न, ऊभा येऊन ठाकला तो दाराशी, नविन पिढीला वाचवण्याची, तयारी एका नविन युद्धाची. सुसाट सुटलेल्या तरुणाईला, दारु, घुटका, ते ब्राऊन सुगरपासुन, वाचवण्याची!, तयारी एका नविन युद्धाची. प्रतेक पालकाने घेतली धास्ती, आपल्या मोबाईलमय झालेल्या, ईवल्याशा पाल्याची........, करावी लागेल सर्व आईबाबांना, त्यातून त्यांना बाहेर काढन्यासाठी. तयारी एका नविन युद्धाची.., तयारी एका नविन युद्धाची. ===================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
