माहेर
माहेर माहेर म्हणजे उन्हात मायेची सावली , माहेर म्हणजे लहानपणीच्या रमलेल्या आठवणी . माहेर म्हणजे गमावलेलं बालपण, माहेर म्हणजे हळूहळू आलेल्या शहाणपण. माहेर म्हणजे अंगणातला पारिजात, माहेर म्हणजे एकत्र केलेलं जेवण, माहेर म्हणजे आता डोळे बंद केल्यावर दिसणार ते अंगण. माहेर म्हणजे आई ,माहेर म्हणजे बहिण. माहेर म्हणजे आजी आजोबा काका काकी भावंडांचा किलकीलाट. माहेर म्हणजे भावंडांमधला वाद, मारामारी भांडणात, तेव्हा रडून केलेला दंगा, आणि आता ते आठवून थांबून ठेवलेला हुंदका. माहेर म्हणजे आता पुन्हा भेटण्याची ओढ. माहेर म्हणजे स्वाभिमान , माहेर माझे अभिमान , माहेर म्हणजे माझे जीव की प्राण
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
