"अर्धवट राव..."
✍️ शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत सांगतात लोक नेहमी तेच, जिथं ते स्वतःला बिनदोष ठेवू शकतात... जिथं स्वतः चुकलेले असतात, तो भाग ते कधीच बोलत नाहीत… डोळ्यांत अश्रू असतात, पण मनात अजूनही कडवटपणा दडलेला असतो… आणि आपणही ऐकतो फक्त एक बाजू, दुसरी बाजू समजून घ्यायचं भानच राहत नाही… अर्धवट सांगणारा चुकीचा असतोच, पण अर्धवट ऐकणारा — तो त्याहूनही मोठा महामूर्ख असतो! सत्य नेहमी आरडाओरड करत नाही, ते शांत राहतं… पण ज्याला समजायचं असतं, त्याला त्या शांततेतही खूप काही ऐकू येतं…
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
