शीर्षक: "परिस्थिती – अंतःकरणाच
शीर्षक: "परिस्थिती – अंतःकरणाची परीक्षा" (लेखक: शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत) कधी वाटतं... सगळं संपलंय, आता काही उरलं नाही, हातात उरलेत फक्त श्वास... आणि डोळ्यांत साठलेलं पाणी। पण त्याच वेळी हृदयात कुठेतरी एक ठिणगी पेटते – जी म्हणते, “अजून शेवट झालेला नाही... अजून तु चालतोयस!” परिस्थिती येते जेव्हा... ती रडवत नाही फक्त, ती अंगावर उठते – विश्वास, संयम, आणि जगण्याची ताकद तपासते। जणू एखाद्या चाचणीसारखी – जिथं प्रत्येक चूक एक शिकवण बनते, आणि प्रत्येक अश्रू एक नवा मंत्र देतो। कधी वाटतं – का माझ्यावरच? पण उत्तर आतच असतं... "कारण तूच सक्षम आहेस हे सगळं सहन करायला, तूच निवडला गेला आहेस... घडवण्यासाठी, ढवळून निघण्यासाठी!" वाऱ्याने झाडं हलतात, पण मुळे अधिक घट्ट रुजतात, तसंच काहीसं परिस्थितीचं – ती हलवते, हलकं करते, पण तेवढंच अधिक बळकट करते! - अंतिम चारोळी – “शब्दवेडा” हृदयातून: परिस्थितीने घातलेले घाव होते काटेसारखे, पण त्यातूनच उमलले स्वप्न होते फुलांसारखे। मी हरलो नव्हतो, मी थांबलो होतो थोडा, कारण शब्दवेडा माणूस पुन्हा उठतो नवा ध्यास घेऊन मोठा!
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
