तुझ्या दर्शनाला
तुझ्या दर्शनाला ======================== सकाळी सकाळी प्रभु तुझ्या दर्शनाला, पाणी झालेल्या मेहनतीतुन , चिखल झालेल्या शीवारातुन वाट काढत, सकाळी सकाळी आलो प्रभु तुझ्या दर्शनाला. वाटल होत यंदा पावसाच्या काही सरी पाहुन, योग्य माझ्या मेहनतीचा देसीद मोबदला, पिकाची सुरवातीची हिरवळ पाहुन, तुझ्या कृपेने होईल धान्याचा साठा. पाण ऐनवेळी तुझी ती......., त्रिशुळ डमरु धारी तांडव रुपी प्रतिमा, पाणी ऐवढे पाडले तुने की......, सारे राण खरडुन सफाचट. आता नाही दिवाळी की दसरा, ओले झालेले कपडे फाटकेच....., सीवुन वाळले की. ......, घालुन तोच आमचा दिवाळी दसरा. प्रभु परत परिस्तिथी सुधारली की, सकाळी च यतो तुझ्या दर्शनाला, तो पर्यंत माझ्या विना बघ प्रभु ईतर भक्तांना, यतो परत......., सकाळी च कधी तरी तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. =========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
