🌿 "चार दिवसांची निवडणूक…
🌿 "चार दिवसांची निवडणूक… पण कायमचं दुरावं!" ✍️ शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत त्या रस्त्याने चालताना आठवतोस, हातात सायकल, आणि खांद्यावर दप्तर... एकच भाकर अर्धी तू खाल्ली होतीस, आणि उरलेली मला दिली होतीस! ते दिवस गेले... आज तुझा झेंडा वेगळा आहे म्हणून तू माझ्याकडे पाहणंही टाळतोस... एक अफवा कुठूनशी आली, आणि सगळं काही बदलून गेलं... ज्याच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं, तोच माणूस "विरोधक" झाला... गाव तसाच आहे, पण माणसं वेगळी झालीत! झाडं तेवढीच आहेत, पण सावली हरवलीय... राजकारण फक्त चार दिवसांचं होतं, पण नातं… ते तर जन्मोजन्मीचं होतं ना? झेंडे बदलले, सभा झाल्या, भाषणं .झाली... आणि आपण “आपण” राहिलोच नाही! म्हणूनच सांगतो — > मत तुझं वेगळं असू दे, पण माणूस "आपला" राहू दे... > निवडणूक पुन्हा येईल, पण हरवलेलं माणूस पुन्हा भेटेल का? 💔 शेवटी फक्त एवढंच – "कधी कधी राजकारण जिंकूनही, आपण सगळं हरवतो...!"
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
