ऊधवस्त
ऊधवस्त =========================== जगाच्या बाजारात कधी द्रौपदी, तर कधी सीता होऊन..........., विनाकारणच कधी माझी, साडी, भरसभेत ओढल्या नंतर, तर कधी अग्नीपरीक्षचे दिव्य, पार करुन आयुष्य जगावे लागले. एक वेळ तर मरण बरे वाटले!, पण!! ;"बाळा तुझ्या साठी हे, उधवस्त, जीवन जगावे लागले. मला माहीत आहे आज ना उद्या, तु तुझ्या आईवर झालेल्या आत्याचाराला, नक्कीच वाचा फोडली........., एक आभीमन्यु याच प्रयत्नात ..., मेला माझा. तरी आज उधवस्त झालेले जीवन, सावरुन मी जगते........., बाळा एकच अपेक्षा आहे........, या कलीयुगात....!., उधवस्त झालेले जीवन जगणाऱ्या आईचा बदला, तु भर चौकात कधी घेतेस....., तु भर चौकात कधी घेतेस. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
