"विचारांची औषधं"
"विचारांची औषधं" — शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत सकारात्मक विचार हेच खरी शक्तीची चाहूल, ते फाटलेल्या स्वप्नांनाही देतात नवं फूल... अश्रूंमधूनही उमटतो तेव्हा आनंदाचा सूर, कारण मनामध्ये फुललेलं असतं आशेचं पूर... आणि नकारात्मकतेचं जेव्हा मनाशी नातं जडतं, तेव्हा हृदयाचं आरसंच हळूहळू मोडतं... औषधं थकतात, डॉक्टरही फसतात तेथे, जिथं विचारच हरवतात माणसाला स्वतःमध्ये... मन जिंकलं, की जगही जिंकता येतं सहज, जिथं विचार तेजस्वी, तिथं अंधारही पडतो निखळ... शब्दांचं बाण, आणि आशेचं कवच, या दोन्ही घेऊनच लढा, हेच खरं आयुष्य!
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
