!!.. बाबासाहेब ..!!
अभिमान जगाचा बाबासाहेब दिन दलितांच्या पावलांची उब गुलामी नष्ट केली कायदा लिहून जगण्याला आता मिळाला सन्मान... अंधारात भविष्य सडत होते हुकूमशाही लचके तोडत होती धर्माची डोस्की मळकटली होती दारिद्रयाला भोकं पडली होती... भिम होऊन आला वादळी वारा काळोखात पेटलेली विश्व ज्योत व्यवस्थेची मोडून टाकली कंबर संविधान दिले देशाला खुप सुंदर... महिलांना देऊन अधिकार समान कामगारांचे हटवले अन्याय जुलूम दिले समान कामाला समान वेतन महामानवास आमचा एक सलाम... -©®निरागसं...(गणेश पांढरे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...💐💐
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
