वरवंटा पाटा व खलबत्ता,
वरवंटा पाटा व खलबत्ता ========================== वरवंटा पाटयावर रगडलेली चटनी, चव तीची काय....... , खलबत्तयात कुकुटलेला भाकरीचा मुटका, पाची पंक्वानांना लाजवी त्याची चव. सकाळी दुसऱ्या प्रहरी वोवीचा आवज, समधुर जात्यावर....., आई बहीणचा त्यात नाद बांगडी पैजनाचा. नामशेष झाला आज पाटा वरवंटा, व खलबत्तयाचा आवाज. या टेक्नीकल युगात आले राक्षसी आजार, आज गीरनी, मीक्सर........, यांच्या आवाजात बुडाले बांगडी पैजन. वोवीलाही विसरल्या माता बहिणी, आता चोली के पिछेवर........गान्यावर, ते फिरवु लागल्या चटनी. बदल हा नियम आहे..., पण प्रकृतीची ओळख आई बहीणच, घालुन जीन पॅंन्ट आता...., आता कसी झाकेल तोंड आपल्या चीमुकल्यांचे, पदराने...., उन्हापासुं करन्या रक्षण, ऊन्हापासुन करन्या रक्षण. =============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
