आठवण
तुझ्या विना भासत आहे रे जणू आज चाफा फुललाच नाही, त्याचा सुगंध आज हवेत दरवळाच नाही... तुझ्या विना आज चंद्र दिसलाच नाही, मंद प्रकाश आज चमकलाच नाही... तुझ्या विना मनाचा बाग जणू सुकून गेलाय, गालावरती ओघळणाऱ्या अश्रूंनी जणू भिजून निघालाय... आठवणीत तुझ्या मन आतुर वाटेकडे बघत बसते रे, दिसाशील तू पून्हा एकदा याचीच चाहूल लागून असते रे... फुलपाखरू बनून या प्रीतवेड्या फुलाकड ये न रे, सुखलेलं फुल आहे बघ तुझ्याविना त्याला एकदा मिठीत घे न रे.. एकदा मिठीत घे न रे...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
