महिला दिन ...!!
शिक्षण घेता 'विद्या' मिळाली नोकरी उद्योगात 'लक्ष्मी' पावली सकाळ होता जागी झाली 'उषा' दिवस संपताना ती झाली 'संध्या'... पुस्तक वाचताना असते 'सरस्वती' मंदिराच्या गाभाऱ्यात चालते 'आरती' स्वयंपाकघरात परिपूर्ण 'अन्नपूर्णा' कठोर परिश्रम म्हणजेच 'साधना'... जीवन फुलवण्यासाठी 'उज्ज्वला' कविता रचताना लागते 'प्रज्ञा' आनंद मिळण्यासाठी मांडतो 'कविता' तुम्हा वाचकांना मोहून टाकते 'मोहिनी'... आईच्या प्रेमात दिसते 'ममता' आजीच्या निरागसं डोळ्यातील 'करुणा' दाटून आला हुंदका घायाळ होते 'भावना' आपल्या माणसांवर सदा असावी 'श्रद्धा'... कड्या कपारीत नांदते 'सह्याद्री' अन्यायाचा थरार 'कृष्णामाई' तुकोबाच्या गाथ्यात भिजली 'इंद्रायणी' खळखळ वाहते 'गंगा, यमुना, गोदावरी' ... स्वराज्याची माऊली 'जिजाई' घोड्यावरती टाच मारली 'अहिल्याबाई' शिक्षणाची ध्यास 'सावित्रीबाई' पहिली डाॅ. झाली 'आनंदीबाई'... भारतरत्नाची खाण 'लतादीदी' अंतराळाची सखोल झेप 'कल्पनाची' तु अभिमान जगताची कुशल 'नारी' स्वप्नाला लाऊन पंख घे उंतूग 'भरारी' बाळासाठी झालीस तू 'अंगाई' नात्यासाठी घराची झालीस 'सावली' तेवत राहतेस सदैव तू होऊन 'ज्योत' आदर राहू दे तुझाच आता 'मना मनात' जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🙏🏻💐💐 -©® निरागसं (गणेश पांढरे)
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
