निखिल
पेन हाती माझे, शब्द मनात दाटतोय। तुझ्यासाठी लिहावे तरी काय हा प्रश्न समोर मांडतोय ? वेळ संध्याकाळची सावली सूर्याने केली, आता लिहून बघावे काहीतरी तुझ्यासाठी। रात्र चांदण्याने उजागर होते मनात एक भावना कशी काय निर्माण होते? मन हे कोमल, त्यातच एक आवड, तसाच काहीतरी जीवन आणि जीवनात तुझा आगमन। " निखिल " म्हणजे फक्त नाव नाही एक ओळ आहे . जी शब्दात कशी का मांडावे समजत नाही, शब्दाला विराम लागतो परंतु तुझ्यासाठी कुठला विराम आणावे आणि आणावे तर कुठे कसं काय लावावे कळत नाही। शब्दाचा तालमेल मांडावा कसा प्रेमाच्या सागर सांगावा कसा । तुझे शब्द फुलासारखे आणि हसणे त्यात सुगंधासारखे तुझे मन म्हणजे बाग ना सीमा नाही स्वार्थ। नसलो मित्र एकमेकाचे तरी काही फरक पडत नाही डोळ्यांना अश्रूशिवाय आपले कोणीच वाटत नाही । ओळखीचे नसलो तरी तसं काही वाटलं नाही बोलायला बसलो तर तुझ्याइतक आपलं कोणीच वाटलं नाही। *********************
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
