शेतकरी राजा
शेतकरी राजा ======================== ढुंगनावर मास नाही राहील शेतकऱ्याच्या, सगळे कसे आरामात पण, शेतकरी मरतो दररोजच उन्हात, शेती कर नाहीतर, फासी घेऊन मर, हे शेतकरी राजाला दोनच प्रर्याय. लाईन आली डीपीवर जाऊन लाईन टाक, रात्री बेरात्री पाईप लाईन बदलून, पाणी दे......, बेभरोसी लाईन, म्हणुन, बायकोची पोत ईकुन, सोलार पंप आन. लेकरा बाळा सोबत रात्र घालायची संधी, कधीतरी वर्षातुन...., एकदो वेळ....., काम कर नाही तर मर. पिक नीघल तरी सुख नाही, शावकारी फेडन्यापायी, भाकर गोड लागते नाही, शेती शेतकऱ्यांनीच कराव. दुसऱ्यांनी फक्त शेतकरी राजा म्हणून हीनवाव, राजा म्हणुन हीनवाव. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
