nature
आज म्हटले शांत बसावे, निसर्ग करून काही शिकावे. कसली घाई गडबड नाही, वाऱ्यासंगे अलगद डुलावे. फुलांकडून काही शिकावे, इवल्या अशा आयुष्यात दुसऱ्यांना भरभरून द्यावे . नुसत्या आपल्या असण्याने त्यांच्या आयुष्यात रंग आणि सुगंध भरावे. आज म्हटले हळूच पहावे, अंगणातल्या झाडाला. त्याचा किती वापर किती जणांना. पक्षी आपले घरटे बांधी निवांत त्याच्या आसऱ्याला . सावली जाण्या येणाऱ्या यात्रींना. फळे तर मुक्त हस्ताने देती ते सर्वांना, पक्षी प्राणी माणसे सगळेच एक असे त्यांना. किती शिकावे सांगा तुम्ही या मुक्त जीवांकडून, आणि किती घ्यावे तुम्हीच सांगा त्यांच्याकडून.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
